जाणून घ्या अब्जाधीशांचे शौक

जगात अब्जाधीशांची संख्या वाढतच चाललेली असताना या अब्जाधीशांचे शौक काय असतील यासंबंधी सर्वसामान्य माणसाला कुतुहल असणे साहजिक आहे. या अब्जाधीशांची संपत्ती कुठून येते, कोणत्या स्वरूपात असते याबाबतही अनेकांना कुतुहल असते. या साठी नुकतेच एक सर्वेक्षण वेल्थेक्स अॅन्ड यूबी बिलिनेअर गणना २०१३ नुसार करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वसाधारण अब्जाधीशाच्या आवडीनिवडी बर्‍याचशा प्रमाणात समान असतात. जगातील अब्जाधीशांच्या या सर्वेक्षणात असे दिसले की सर्वांची सरासरी चार घरे आहेत आणि त्याची किंमत सरासरी २ कोटी डॉलर आहे. या अब्जाधीशांना स्वतःच्या मालकीची नौका असणे आवडते तसेच स्वतःच्या मालकीची जेटविमानेही आवडतात. बाकी शौकात दुर्मिळ आणि महागड्या वस्तूंचे कलेक्शन ही आवड समान आढळली आहे.

जगातील अब्जाधीशांत ८७ टक्के प्रमाण पुरूषांचे असून त्यांची सरासरी मालमत्ता ३ कोटी डॉलर आहे. महिलांची संख्या तुलनेते कमी आहे मात्र त्याची मालमत्ता सरासरी ३.२ कोटी डॉलर्स आहे. अब्जाधीशांत सरासरी मुलांचे प्रमाण दोन असले तरी १५ टक्के अब्जाधीशांना चार अथवा त्यापेक्षा अधिक मुले आहेत. त्यांच्या संपत्तीत ४२ टक्के संपत्ती स्वतःच्या होल्डींग स्वरूपात, ३५ टक्के अब्जाधीशची संपत्ती शेअर्स स्वरूपात, १८ टक्के लोकांची संपत्ती रोकड अथवा अन्य रूपात आहे तर ३ टक्क रियल इस्टेट स्वरूपात आहे.

अब्जाधीशांत ६८ टक्के अब्जाधीश पदवीधर आहेत  त्यात हॉवर्ड विद्यापीठात शिकलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. बाकीत अन्य १० अमेरिकन विद्यापीठांचा समावेश आहे तर ब्रिटनमधील फक्त केंब्रिज विद्यापीठाचा समावेश आहे. बहुतेक सर्व श्रीमंतांना सिंगापूर, र्हॉंगकाँग, स्वित्झरर्लंड या ठिकाणी सहलींना जायला आवडते असेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

Leave a Comment