उर्जेसाठी आहार

आळस, थकवा किंवा उदासीनता या गोष्टी दगदगीमुळे होतात. दगदग ही केवळ शारीरिकच असते असे नाही. ती मानसिक सुद्धा असू शकते. झोप कमी मिळणे, नैराश्य, आजार आणि एकंदरीत आरोग्य यावर थकवा अवलंबून असतो. तणावपूर्ण आयुष्य हा अशा थकव्याचे महत्वाचे कारण आहे. परंतु थकव्याचे कारण मानसिक असले तरी परिणाम मात्र शारीरिक असतो. म्हणून शरीराला चांगला आहार देऊन आपण शरीराची होणारी ही झीज भरून काढू शकतो. त्यासाठी खालील गोष्टी केल्या पाहिजेत. आहारामध्ये दाळी त्याचबरोबर प्रथिनयुक्त पदार्थ, ब जीवनसत्व आणि विशेषत: लोह आवश्यक असते. पाणी हे खाद्य नव्हे. परंतु दगदगीमुळे शरीराचे डी-हायड्रेशन होते आणि ते नेहमी पाणी पिऊन भरून काढता येते.

थकव्यामुळे शरीराची होणारी झीज भरून काढण्याकामी ङ्गळांचा उपयोग होतो. ङ्गळातील ग्लुकोज शरीराच्या चयापचय क्रियांना गती देते. तेव्हा द्राक्ष, केळी, सङ्गरचंद आणि लिंबू वर्गीय ङ्गळे आपल्या आहारामध्ये अधिक असावीत, ज्यामुळे ऊर्जा प्राप्त होते. काजू, शेंगादाणे अशा सुक्या-मेव्यातून आयर्न प्राप्त होते. त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्निशियम यांचाही पुरवठा होतो. शरीराला ऊर्जा पुरविण्याच्या बाबतीत पालेभाजा सर्वाधिक उपयुक्त असतात. त्यातून ङ्गोलेट हे द्रव्य प्राप्त होते. त्याचबरोबर मॅग्निशियम आणि आयर्नही मिळते.

मॅग्निशियम हवे असेल तर डार्क चॉकलेट घ्यावे. हे चॉकलेट मॅग्निशियमचा मोठा श्रोत आहे. मूग, हरभरा अशी द्विदल धान्ये शरीराला ऊर्जा पुरविण्याच्या बाबतीत ङ्गारच उपयुक्त असतात. आपण या धान्याच्या दाळी करून खातो, त्याऐवजी त्या डायरेक्ट घेतल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये योगुर्टचा वापर करण्याची माहिती लोकांना नाही. परंतु ङ्गळे आणि चक्का यांचे जे मिश्रण तयार होते, साधारण त्या पद्धतीचे हे यूरोपियन शिकरण आहे.

मात्र ते त्या देशात ङ्गार पौष्टिक समजले जाते. कारण त्यामध्ये टायरोसिन नावाचे ऍमिनो ऍसिड विपुल प्रमाणात उपलब्ध असते. सर्वात महत्वाचे म्हणजे अंडे. कोंबडीच्या अंड्यामध्ये प्रोटिन प्रचंड प्रमाणात असतो. कोणत्याही खाद्य पदार्थामध्ये नसतील एवढी प्रथिने अंड्यामध्ये असतात. प्रथिनांच्या सोबतच आयर्न आणि क्लोरीन यांचाही पुरवठा अंड्यातून होतो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment