व्हेनेझुएलाची ग्रॅबिएला विश्वसुंदरी

मास्को – व्हेनेझुएलाची २५ वर्षीय गॅब्रिएला इश्लर हिने २०१३चा विश्वसुंदरी किताब पटकविला असून मास्को येथे पार पडलेल्या शानदार समारंभात गतवर्षीच्या विजेत्या अमेरिकेच्या ओलिव्हिया कल्पे हिने हिर्‍याचा लखलखता मुकुट गॅब्रिएलाच्या शिरावर ठेवला. या स्पर्धेत ८६ सुंदरी सहभागी झाल्या होत्या त्यात भारताच्या मानसी मोघे हिने शेवटच्या दहा नंबरात स्थान मिळविले मात्र अंतिम पाचांत ती येऊ शकली नाही. जगभरातील लक्षावधी नागरिकांनी हा सोहळा टिव्हीवर पाहिला.

विशेष म्हणजे व्हेनेझुएलाने विश्वसुंदरीचा किताब जिंकण्याची ही सातवी वेळ आहे. या देशात सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद हा राष्ट्रीय गौरव मानला जातो. गॅब्रिएला हिने या विजयाबद्दल खूप आनंद व्यक्त करतानाच भावना व्यक्त करणे अवघड जात असल्याचे सांगितले. ती म्हणाली , मी नशीबवान आहे मात्र हे विजेतेपद मिळाल्याचे मला आश्वर्यच वाटते आहे. माझ्यासाठी हे खूप मोठे यश आहे.

विश्वसुंदरी स्पर्धेच्या ६१ वर्षांच्या इतिहासात या स्पर्धा प्रथमच रशियात घेतल्या गेल्या. स्पेनची पॅट्रिका ही फर्स्ट रनरअप ठरली.

Leave a Comment