फिलिपिन्सच्या हायत वादळाचे १० हजार बळी?

तक्लोबान – फिलिपिन्सच्या किनार्‍यावर धडकलेल्या भीषण वादळात देशातील बहुतेक शहरांत नुकसान झाले असतानाच या वादळाने आत्तापर्यंत किमान १० हजार जणांचा बळी घेतल्याची आशंका सरकारकडून व्यक्त केली गेली आहे. देशावर आत्तायर्पंत कोसळलेल्या आपत्तीत ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगितले जात आहे.

वादळ धडकल्यानंतरच्या आज तिसर्‍या दिवशीही अनेक ठिकाणी असंख्य लोक मदतीची वाट पाहात आहेत. अमेरिकेने मदतीसाठी सैन्य पाठविण्याची तयारी दर्शविली आहे असेही समजते. लेयने भागाला या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला असून या भागातील ७० ते ८० घरे नष्ट झाली असल्याचे पोलिस प्रमुख सोरिया यांनी जाहीर केले आहे. २ लाख २० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविले गेले आहे मात्र तरीही १० हजारांवर लोक मरण पावले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वत्र उलटलेली वाहने, कोसळलेली घरे, पडलेली झाडे दिसत असून वीजेच्या तारा व खांब वाकल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

Leave a Comment