आयफोन हप्त्याने घ्या शिवाय दोन वर्षे मोफत बोला

अॅपलच्या नव्यानेच बाजारात येत असलेल्या आयफोन पाच सी व आयफोन पाच एस या दोन मॉडेल्सच्या भारतातील विक्रीचे अधिकार घेतलेल्या रिलायन्स टेलिकम्युनिकेशनने या फोनच्या विक्रीसाठी आकर्षक येाजना सादर केली आहे. भारतीयांसाठी ही योजना असून त्यात हे दोन्ही आयफोन ग्राहक हप्त्यावर घेऊ शकणार आहेत.

अधिक ग्राहक मिळविण्यासाठी रिलायन्सने हप्ता सुरू असताना दोन वर्षे कोणतेही बिल आकारले जाणार नसल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहक फोन खरेदी केल्यानंतर दोन वर्षे कितीही वेळ फोनवरून बोलू शकणार आहेत तसेच थ्रीजी इंटरनेटचा वापरही अनलिमिटेड करू शकणार आहेत. अमेरिकेत आयफोन अशाप्रकारे कॉन्टॅक्टवर मिळतात तसेच ते भारतातही उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही योजना वरील दोन मॉडेल्ससाठीच लागू असून हप्त्यावर घेताना कोणेतही डाऊन पेमेंटही ग्राहकाला करावे लागणार नाही असेही स्पष्ट केले गेले आहे.