अंतराळवीरांनी स्पेस वॉकमध्ये नेली ऑलिंपिक ज्योत

दोन रशियन अंतराळवीरांनी शनिवारी इतिहासात प्रथमच सोची २०१४ साठीची टॉर्च इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर आणून स्पेस वॉक करण्याचा इतिहास रचला. अर्थात ही टॉर्च सुरक्षेच्या कारणास्तव पेटविलेली नव्हती. ओलेग केटोव्ह व  सर्जी रानझान्स्की यांनी या टॉर्चसह केलेल्या स्पेसर्वाकचे थेट प्रक्षेपण दूरदर्शवरून करण्यात आले. केटोव्हने ही टॉर्च रानझान्स्की कडे दिली. निळ्या पृथ्वीच्या पार्श्वभूमीवर ही रिले अतिशय सुंदर दिसल्याचे व हा सर्व कार्यक्रम शेड्यूल प्रमाणे पार पडल्याचे मिशन कंट्रोल सेंटरकडून जाहीर करण्यात आले.

ही टॉर्च कक्षा स्टेशनवर दोन दिवस ठेवली जाणार आहे व नंतर सोमवारी रशियाचा फॉडोर युरचिकिन, यूएसचा अॅस्टो करेन नायबर्ग व इटलीचा लुका परमिटनो ही टॉर्च परत आणण्यासाठी सोयूझ यानातून पुन्हा अंतराळात जाणार आहेत असे युरोपियन स्पेस एजन्सीने जाहीर केले आहे. रशियातील सोची येथे फेब्रुवारी ७ ते २३ या काळात भरत असलेल्या हिवाळी ऑलिपिक स्पर्धात या टॉर्चच्या सहाय्यानेच ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. यापूर्वी दोन वेळा म्हणजे १९९६ व २००० साली टॉर्च अंतराळात नेण्यात आली होती मात्र तिच्यासह स्पेस वॉक केला गेला नव्हता. हा विक्रम यंदा केला गेला आहे.

या २२ व्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा रशियात प्रथमच भरत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment