अन्नात् भवती प्रजनन:

सध्या सार्‍या जगामध्येच पुरुषांची घटती प्रजनन क्षमता हा चिंतेचा विषय होऊन बसला आहे. त्यावर काय उपाय योजावेत यावर चर्चा सुरू आहे. परंतु काही तज्ज्ञांनी विशिष्ट आहाराच्या माध्यमातून प्रजनन क्षमता वाढवता येते असा दावा केला आहे. या आहारामुळे पुरुषांबरोबर स्त्रियांचीही प्रजनन क्षमता वाढते. या अन्नद्रव्यांमुळे जोम वाढतो, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, बिजांडांची संख्या वाढते. एकुणात मुलाला जन्म देण्याची क्षमता वृद्धिंगत होते.

महिलांसाठी आहार – महिलांची प्रजनन क्षमता वाढविण्याकरिता लोहयुक्त मांसाहार उपयुक्त ठरू शकतो. कारण मांसाहारातील लोहामुळे लाल रक्तपेशींची संख्या वाढते. त्याचबरोबर अशक्तता कमी होते. या मांसातून झिंक मिळते, ज्याचा परिणाम बिजांडांच्या निर्मितीवर सकारात्मक होतो. त्याचबरोबर महिलांनी काजू, शेंगदाणे खाणे अधिक उपयुक्त ठरू शकते. त्यातल्या त्यात बदाम अधिक गुणकारी ठरतात. कारण त्यात ई जीवनसत्व जास्त असते. त्यामुळे महिलांची कामशक्तीे वाढते आणि गर्भपाताची शक्यता कमी होते.

समुद्रात सापडणार्‍या काही प्राण्यांमध्ये कालव नावाचा प्राणी असतो. तो खाण्याची कल्पना कदाचित भारतीय लोकांना मानवणार नाही. परंतु कालवाचे कालवण महिलांची प्रजनन शक्ती वाढविण्यास खूप गुणकारी ठरते. याबाबतीत कालवातील झिंक अधिक उपयुक्त असते. उकडलेले बटाटे हे ‘ब’ जीवनसत्वयुक्त असल्यामुळे कामशक्ती वाढते. पेशींच्या निर्मितीचा वेग वाढतो, अर्थात परिणामी बिजांडांची संख्या वाढून ती नियमित होते. पुरुषांची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी ताजी ङ्गळे अधिक गुणकारी असतात. या ङ्गळातील ‘क’ जीवनसत्वामुळे पुरुषांच्या शुक्राणूंचा नाश होण्याची प्रक्रिया मंद होते.

ङ्गळांमध्ये आंबा, स्टॉबेरी, द्राक्ष यांचा वापर जास्त करावा. आपल्या अन्नातील लसूण शुक्राणूंच्या वाढीस उपयोगी ठरणारा असतो. त्याचबरोबर कॉडलिव्हर ऑईल हेही गुणकारी ठरते. सर्वात उपलब्ध असणारा स्वस्त खाद्य पदार्थ म्हणजे मिरची. मिरची ही अनेक परींनी उपयुक्त असतेच. तिच्यामुळे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि जनन संस्थेला रक्ताचा पुरवठा होऊन तिची क्षमता वृद्धिंगत होते. अपत्यहीन दांपत्यांना मिरची हे अक्षरश: वरदान ठरते. हे सारे खाद्यपदार्थ ङ्गार महाग नाहीत. परंतु त्याचा गुण मात्र लक्षणीय आहे.

Leave a Comment