सुरक्षा यंत्रणेतील हेरांने केली होती दहशतवादयांना मदत

नवी दिल्ली – मुंबईवरील २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्याल सुरक्षा यंत्रणेतील पाक गुप्तिहेरानी मदत केली होती असे धक्कादायक मत ब्रिटनमधील दोघा पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकातून नोंदविले आहे. या पाक हेराचे नाव ‘हनी बी’ होते असे या पुस्तकात म्हटले असून यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. याचा शोध घेण्यानचे आव्हा न पोलिस पथकासमोर असणार आहे.

या संदर्भात ब्रिटनमधील पत्रकार एँड्री लेवी आणि कैथी स्कॉट क्लार्क या दोघा पत्रकारांनी सीज नामक एक पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकात त्यांनी २६-११ च्या मुंबई हल्ल्यावर भाष्य केले आहे. ‘मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पाकचा हनी बी नामक हेर भारताच्या सुरक्षा यंत्रणेत काम करता होता. या हेराने सागरी मार्गाने मुंबईत येणा-या दहशतवाद्यांना मुंबईत आल्यावर जागा कशा ओळखायच्या याची माहिती पुरवली होती असा उल्लेख या पुस्तकात केला आहे.यामुळे आता नव्याी वादाला तोंड पुटले आहे.

या पुस्तकात आयएसआयने भारताचे सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण कागदपत्रेही हेडलीला दिली होती. ही कागदपत्र पाकने भारतीय सैन्य व पोलिसांकडून प्राप्त केली होती.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकमधून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईतील प्रमुख हॉटेल, रेस्टॉरंट आणि सीएसटी रेल्वे स्थानकाला लक्ष्य केले होते. यात शेकडो निष्पापांचा मृत्यू झाला होता. अजमल कसाब या दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. याप्रकरणी कसाबला काही महिन्यांपूर्वीच फाशीची शिक्षा देण्यात आली.

Leave a Comment