मॉडेल शिखा जोशीला अटक

मुंबई – आंबोली पोलिसांनी प्रसिध्द सौदर्य शल्य चिकित्सक डॉ. विजय शर्मा यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी मॉडेल शिखा जोशी आणि तिचा भाऊ विशेष जोशी या दोघांना अटक केली आहे. त्याय दोघांनी विजय शर्मा यांची आई घरात एकटी असताना गोंधळ घातला असल्याेचा आरोप त्या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

अंधेरी येथे रहाणारे विजय शर्मा यांची आई घरात एकटी असताना, शिखा आणि तिचा भाऊ विशेष दोघांनी घरात घुसून गोंधळ घातला व तोडफोड केली.या प्रकाराने भांबावलेल्या विजय यांच्या आईने आंबोली पोलिसांनी दूरध्वनीकरुन माहिती दिल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले.

यावेळी शिखा आणि विशेष या दोघा बहिण-भावांनी तेथे आलेल्या पोलिसांबरोबर अरेरावीची भाषा करत गैरवर्तन केले. या प्रकरणी विजय शर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आंबोली पोलिसांनी शिखा आणि विशेषला ३०७, ४२७, ५०४ आणि ५०६ या कलमांखाली अटक केली आहे. त्यांच्याकडे या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Leave a Comment