मुस्लिमांनी संपर्क करु नये,ची वादग्रस्त जाहिरात

मुंबई – पुण्या-मुंबईसह राज्यातील इतर शहरात घर घेणे म्हणजे आयुष्यभर साठवलेली पुंजी रिकामी करावी लागते. सर्वसामान्य व्यक्तींना होत नसला तरी मोठ्या गृहसंकुलात घर विकत किंवा भाड्याने घेताना मुस्लिम बांधवा विरोधाला सामोरे जावे लागते. गृहसंकुलांमध्ये घर खरेदी करताना मुस्लिमविरोध चोरीछुपे सुरू होताच परंतु आता एका बांधकाम व्यावसायिकाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये चक्क मुस्लिमांना प्रवेश नाही, असा स्पष्ट उल्लेख केल्याने मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मुस्लिमांसाठी घर घेण किती कठीण असते हे सीएनएन-आयबीएनच्या कोब्रापोस्ट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाले होते. उत्कृष्ट नवाकोरा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट, मोकळी हवा, नैसर्गिक प्रकाश, उच्चभ्रू सोसायटी, मुस्लिम नकोत, कार पार्किंगसह तात्काळ विक्री, पाचवा मजला, इच्छुकांनी कृपया कॉल करावा. जाहिरातीत उल्लेख असलेल्या दादरमधील मध्यवर्ती भागातील या सोसायटीला एका वृत्तवाहिनीने भेट दिली होती. त्यावेळी सोसायटीत फक्त शाकाहारी लोकच राहतात. त्यामुळे मुस्लिमांना या ठिकाणचे फ्लॅट विकले जात नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरही मुंबईतील गृहसंकुलामधील नो मुस्लिम प्लीजचा फलक खाली उतरताना दिसत नाही.

या जाहिरातीमध्ये जागा विकायची आहे तसेच घर भाड्याने द्यायचे आहे अशा स्वरुपाची एक जाहिरात आहे. मात्र या जाहिरातीमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वेबसाईटवर अशा प्रकारची ही पहिलीच जाहिरात नाही. वेबपोर्टलवर नो मुस्लिम्स सर्च केल्यास असे शेकडो जाहिराती पाहायला मिळतात. या जाहिरातींविरोधात अ‍ॅडव्होकेट शेहजाद पूनावाला यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment