अभिषेक बच्चन करतोय वजन कमी

आगामी काळात येणा-या सिनेमासाठी अभिनेता अभिषेक बच्चन गेल्याे काही दिवसांपासून वजन कमी करण्यााची तयारी करताना दिसत आहे. आगामी काळातील सिनेमासाठी आठ पॅक अॅदब्स तो बनवत आहे. सलमान, जॉन आणि हृतिकसारख्या अभिनेत्यांच्या रांगेत आता तोदेखील येऊ इच्छित असल्याचे समजते.

सलमान, जॉन आणि हृतिक जसे सिनेमात शर्ट काढून फेकतात. त्याचप्रमाणे त्यालाही वजन कमी करायचे आहे. गेल्या वर्षी अभिषेकने याच प्रयत्नात त्या ने १६ किलो वजन कमी केले होते. यंदा तो ‘टेक्नोशेप’ करण्यात व्यग्र आहे. याची माहिती ही अभिषेक बच्चंनने टवीटरवर वरून महिती दिली.

खरं तर हे यंत्र कमरेजवळील वाढलेली जास्तीची चरबी कमी करून त्याला नवा आकार देते. अभिषेकने गुरुवारी या यंत्राचा फोटो ट्विट केला आणि सगळ्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे. आठवड्यातून तीनदा ४० मिनिटे या टेक्नोशेपवर घालवल्यानंतर याचा परिणाम लगेच दिसू लागतो. १५.५लाख रुपयांच्या या यंत्राचा वापर ब्रिटेनमध्ये अनेक कलावंतांनी केला आहे. त्याप्रमाणे तो देखील याचा वापर करीत आहे.

Leave a Comment