सीबीआय, इंडियन मुजाहिदीन माझे विरोधक-मोदी

बहराईच – सीबीआय आणि इंडियन मुजाहिदीनच्या आडून केंद्र सरकारने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस, सपा आणि बसपचे त्रिकूट मैदानात उतरणार नाही. सीबीआय आणि इंडियन मुजाहिदीनला माझ्यामागे लावून देण्यात आले आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये शुक्रवारी मोदींनी जाहीर सभा घेतली त्याआप्रसंगी ते बोलत होते. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असून कानपूर, झांसीनंतर मोदींची ही तिसरी सभा होती. या वेळी सपा, बसप आणि काँग्रेस तिन्ही पक्षांवर त्यांनी तोफ डागली.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, गुजरातमध्ये मला पराभूत करता आले नाही अशा लोकांनी आता वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. कधी सीबीआयचा भुंगा मागे लावून देतात, तर कधी इंडियन मुजाहिदीनला मोकळे रान करून देतात. दहशतवाद्यांसमोर आम्ही कधीही झुकलो नाही. झुकणारही नाही. हिंमत असेल तर लोकशाहीच्या मार्गाने मुकाबला करा. पाठीवर वार करू नका, असा इशाराही दिला.

Leave a Comment