विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा करणार राज्य सरकार गौरव

मुंबई – विक्रमवीर सचिन तेंडुलकरने क्रिकेटसाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्याचा राज्य सरकारतर्फे गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी गौरव समितीची स्थापना केली आहे. ही समिती सत्कार सोहळ्याचे स्वरूप ठरवेल.

मासटार बलास्टसर सचिन तेंडूलकरचे क्रिकेटमधील योगदान महत्तचवाचे आहे. त्याच्या या यशामुळे सर्व देश झोकाळून निघाला आहे. त्याेने क्रिकेटसाठी दिलेले योगदान कोणीच विसरू शकत नाही. विक्रमवीर सचिन तेंडुलकरने दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्याचा महाराष्ट्रच सरकारतर्फे गौरव करण्यात येणार आहे या सोहळ्याची तारीख आगामी काळात सचिनशी संपर्क साधून ठरवण्यात येणार आहे.

या समितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. तर क्रीडामंत्री पद्माकर वळवी समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबईत होणारा २००वा कसोटी सामना संपल्यानंतर सचिन क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या लौकिकात भर पडली. त्या दृष्टीने सचिनचा सत्कार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याकचे समजते.

Leave a Comment