मनिला – या वर्षातील जगातील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ हैयान’ ने शुक्रवारी सकाळी मध्य फीलिपीन्सच्या किनारपट्टीला धडक दिली. लेईटी आणि सामार या दोन बेटांना हैयानने तडाखा दिला असून, येथे ताशी 275 किमीच्या वेगाने वारे वाहत आहे.तसेच समुद्रात पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत.
या चक्रीवादळामुळे लाखो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून, वीजप्रवाह खंडीत करण्यात आला आहे. किनारपट्टी, नदीकिनारी रहाणा-या लाखो लोकांची शाळा, छावण्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. वादळामध्ये घरांचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.
एक कोटीहून अधिक लोकांना या वादळापासून धोका आहे. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या केबू प्रांतालाही वादळापासून धोका आहे. वादाळामुळे शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, रेल्वे, विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.