सुनील केंद्रेकर यांच्या बदलीची पुन्हा चर्चा

बीड – जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीची पुन्हा एकदा बीडमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सुनील केंद्रेकरांची बदली होऊ नये यासाठी बीडकर एकत्रित आले आहेत. यासंदर्भात आज बीडमध्ये बैठक घेण्यात आलीय आणि केंद्रकरांच्या बदलीला विरोध करण्यात आलाय.

केंद्रेकरांची बदली रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी बीडकरांनी दिलाय. मागील वेळी बीडमध्ये सुनील केंद्रेकरांच्या बदलीवर वातावरण तापलं होते. स्वच्छ प्रतिमेचा आणि लोकांचं काम करणारा अधिकारी म्हणून केंद्रेकरांची ओळख आहे.मात्र काही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळं केंद्रकरांची बदली केली जात असल्याचा आरोप बीडकर करतायत. त्यामुळं त्यांची बदली करु नये अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment