वादग्रस्त ‘सत्या २’ अखेर आज रिलीज होतोय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शनापासून रखडलेला दिग़दर्शक राम गोपाल वर्मा यांचा वादग्रस्त सिनेमा ‘सत्या २’ अखेर शुक्रवारी रिलीज होत आहे. बहूचर्चीत ‘सत्या २’ हा सिनेमा २५ ऑक्टोबरला रिलीज होणार होता. रिलीजच्या काही दिवसापूर्वीच त्यांनी रिलीज डेट पुढे ढकलली. पण अखेर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी रिलीज होणार आहे. या सिनेमाकडून रामूला खूप अपेक्षा आहेत.

यापूर्वी १९९७साली आलेला रामूचा सत्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यातली भिकू म्हात्रे, सत्या किवा मग कल्लू मामा ही पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यामुऴेच ‘सत्या २’ बद्दल सगळीकडेच उत्सुकता होती. पण सत्या २चा सत्याशी काहीही संबंध नाही हे राम गोपाल वर्माने आधीच स्पष्ट केले आहे.

आगामी काळात येत असलेल्या. ‘सत्या’ आणि ‘सत्या २’ चे कथानक पूर्णपणे वेगळे आहे. आजच्या काळात अंडरवर्ल्डचा बदलत गेलेला चेहरा आणि त्याचा परिणाम याचं चित्रण ‘सत्या २’ मध्ये रामूने केले आहे. रामूच्या मागच्या काही फिल्म्सने बॉक्स ऑफिसवर अपयश पाहिलं आहे. अलिकडे रामूच्या नावावर एकही मोठी हिट नाही आहे. त्यामुळे या फिल्मकडून रामूलाही खुप अपेक्षा आहेत.