युवराज चार्लस व कॅमिला पुणे भेटीवर

पुणे – येत्या रविवारी प्रथमच ब्रिटनचे युवराज चार्लस आणि त्यांच्या पत्नी कॅमिला पुणे भेटीवर येत असून त्यांच्या भेटीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. टर्फ क्लब हाऊसचे जनरल मॅनेजर जॉन फर्नांडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज व युवराज्ञी पुण्यात तीन ठीकाणी भेटी देणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूट, खडकी वॉर सिमेंट्री व रॉयल वेस्टन इंडियन टर्फ क्लबचे क्लब हाऊस. येथे ते हाय टी घेतील.

सर्वप्रथम ते खडकी येथील वॉर सिमेंट्री ला भेट देणार आहेत. पहिल्या, दुसर्‍या महायुद्धात व अन्य युद्धात मरण आलेल्या महिला व पुरूषांच्या स्मरणार्थ हे मेमोरियल आहे. येथे युवराज भेटीची तयारी जोरदार केली जात असून रंगरंगोटी, फूटपाथ दुरूस्ती अशी कामे सुरू आहेत. दुपारी तीन वाजता ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. जगात लस उत्पादन करणार्‍या मोठ्या संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना डॉ. सारयस पूनावाला यांनी केली असून येथे तयार होणार्‍या लसी १३० देशांत निर्यात केल्या जातात. पूनावाला यांची जेव्हा युवराजांची भेट झाली होती तेव्हा त्यांनी या संस्थेची माहिती युवराज चार्लस यांना दिली होती असे समजते.

त्यानंतर ते टर्फ क्लबला येणार असून येथे हाय टीचा आस्वाद घेणार आहेत. युवराज चार्लस व युवराज्ञी कॅमिला यांची ही पहिलीच पुणे भेट आहे

Leave a Comment