टीम इंडियाकडे २१९ धावांची आघाडी

कोलकाता: ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव ४५३ धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला आता २१९ धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. रोहित शर्मा आणि आर. अश्विनच्या २८० धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाला येथेपर्यंत मजल मारता आली. शेवटची बातमी हाती आली तेंव्हां विंडीजने एक गडी बाद ५५ धावा केल्याा होत्या. अजून दोन दिवस शिल्लक असल्या‍ने या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सकाळी तिसया दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर रोहित शर्मापाठोपाठ आर. अश्विननेही शानदार शतक ठोकले. दोघंची २८० धावाची भागीदार झाल्यानंतर रोहित शर्मा १७७ धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर काही वेळातच आर. अश्विन १२४ धावा करुन तंबूत परतला. रोहित शर्माने २३ चौकार आणि एक षटकारासह १७७ धावा केल्या. तर अश्विनने ११ चौकार लगावत १२४ धावा केल्या. या दोघांच्याे खेळीमुळेच टीम इंडियाला २१९ धावाची आघाडी घेता आली. हे दोघे बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे तळाचे फलंदाज लगेचच बाद झाले.

दुस-या दिवशी उपहाराआधी विंउीजच्या गोलंदाजानी टीम इंडियाची स्थितीती ८२ धावांवर ५ बाद अशी असताना धोनी,रोहित आणि अश्विनने जबाबदारपूर्ण खेळी करत टीम इंडियाला पहिल्या डावात मजबूत आघाडी मिळवून दिली आहे. विंडीजने दुस-या डावाची सुरूवात रडखडत सुरू केली असून त्यांचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेलला भुवनेश्वर कुमारने बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा विंडीजने एक गडी बाद ५५ धावा केल्या होत्या.

Leave a Comment