चित्रपटाप्रमाणे नाटकांनाही मिळणार अनुदान

पुणे,-ˆ मराठीत चांगलं चित्रपट निर्माण व्हावे म्हणून ज्याप्रमाणे राज्यसरकार अनुदान देते त्याच प्रमाणे नाट्यसृष्टी व प्रायोगिक नाट्यसृष्टी यांच्यासाठीही अशीच प्रोत्साहन देण्याची योजना राबवण्यात येणार आहे, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांनी सामाजिक कार्यकर्त्या सिंधु सपकाळ यांना सलाम महाराष्ट्रचा पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक‘मात बोलताना सांगितले.

शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन किर्तीकर, माजीमहापौर दिपक मानकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, इम्पाचे संचालक विकास पाटील, संतोष चोरडीया, अ‍ॅड संभाजी थोरवे यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना थोरवे यांना यावेळी कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री देवताळे म्हणाले, राज्य सरकार चांगल्या चित्रपटांची निर्मिती व्हावी म्हणून अनुदान देत असते पण त्याचा अनेकजण गैरफायदा घेताना दिसतात. हे अनुदान म्हणजे खिरापत नव्हे हे संबंधितांनी लक्षात ठेवावे, या अनुदानाचा गैरफायदा घेतला जावू नये व नव्या देण्यात येणार्‍या नाट्यक्षेत्रासाठीच्या अनुदानाचाही गैरफायदा घेतला जावू नये यासाठी यापुढेही विशेष काळजी घेतली जाणार आहे.

गजानन किर्तीकर म्हणाले, मराठी नाटक आणि चित्रपटांमुळे महाराष्ट्रााची राष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. दर्जेदार कलाकृती निर्माण करताना येणार्‍या समस्या लक्षात घेऊन सरकारने अधिकाधिक निर्मात्यांना सहकार्य केले पाहिजे.

सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, जोपर्यत कलाकार रंगभूमरीवर काम करित असतो, प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतो, परंतु निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या कलेच्या फुलांचे निर्माल्य होऊ न देता त्यांना जपणे हे समाजाचे कर्तव्य आहे. स्प्रिट आर्ट निर्मित येरे येरे पैसा या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला.

Leave a Comment