सर्वात महागडी कार – किंमत फक्त ४६ कोटी रूपये

दुनियेतील सर्वात महागडी कार पुढील वर्षात म्हणजे २०१४ मध्ये जगाच्या बाजारपेठेत सादर केली जात असून या कारची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी तीन कॅटेगरीत नोंदणी केली जाणार आहे असे समजते. या कारची किमत ४६ लाख पौंड म्हणजे ४६ कोटी रूपये असेल असे सांगितले जात आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोम्बोर्गिनी अवेंडॉर एल.पी. ७००-४ मॉडेलची ही कार जर्मन इंजिनिअर रॉबर्ट गल्पन यांनी डिझाईन केली आहे. ही कार अद्यापी निर्मिती अवस्थेत असून ती २०१४ साली पूर्ण तयार होणार आहे. फायबर पासून बनविल्या गेलेल्या कार बॉडीवर पूर्ण सोन्याचा पत्रा चढविला गेला असून त्यासाठी २२ कॅरेटचे ५०० किलो सोने वापरले गेले आहे आणि या कारवर असंख्य मौल्यवान हिरेही जडविले गेले आहेत. त्यामुळे कारची किंमत वाढली असल्याचे सांगितले जात आहे.