राज ठाकरे करणार कुराणचे पठण

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणाचे वाचन करणार असल्याचे जाहीर केले असून इस्लाम धर्म समजून घेण्यासाठी हे कुराणाचा अर्थही समजावून घेणार आहेत असे समजते. मनसेचे उपाध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी कुराणाची बहुभाषिक डिजिटल व्हर्जन लाँच केली असून त्याची पहिली प्रत राज ठाकरे यांना भेट दिली आहे. हे डिजिटल कुराणच राज वाचणार आहेत आणि समजून घेणार आहेत.

चार वर्षांपूर्वीही शेख यांनी कुराणाची मराठी प्रत राज ठाकरे यांना भेट दिली होती. मात्र डिजिटल प्रत हेडफोनच्या सहाय्याने ऐकणे सहज शक्य असून त्यात अर्थही समजणार आहे. यामुळे वेळ मिळेल तसा राज कुराणाचा अभ्यास करू शकणार आहेत असे शेख यांनी सांगितले. ते म्हणाले की कुराणाची डिजिटल व्हर्जन हिदी, मराठी, उर्दू, गुजराथी, बंगाली, तेलगू, तमीळ व मल्याळी भाषेत काढली गेली आहे तशीच ती फ्रेंच, चायनीज, पुश्तू भाषेतही आहे.

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे उर्दूचे चांगले जाणकार होते अशी आठवण राज यांनीच सांगितली होती व त्यांनाही उर्दू समजून घ्यायला आवडेल असेही ते म्हणाले होते.

Leave a Comment