दंतेवाडा- छत्तीसगढमध्येस आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू आहे. त्याव गडबडीचा फायदा घेत दंतेवाडा भागात भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न पोलीसांनी गुरुवारी उधळून लावला. पोलीसांनी दंतेवाडा जिल्ह्यातील रस्त्यावर पेरण्यात आलेले ५० किलोच्या आयईडीचा वापर करण्यात आलेले दोन भूसुरूंग निकामी केले. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि छत्तीसगढमधील स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
गेल्या् काही दिवसांपासून छत्तीसगढमध्येक आगामी काळात होत असलेल्याल विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू आहे. याचा फायदा घेत नक्षलवद़यानी दोरनापाल ते जागरगुंडा या रस्त्यावर प्रत्येकी २५ किलो वजनाचे दोन आयईडी स्टीलच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. पोलीस या भागाची पाहणी करीत असताना त्यांना हे दोन आयईडी आढळले.
केंद्रीय राखीव पोलिस दल आणि छत्तीसगढमधील स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई करीत तातडीने ते दोन्ही निकामी केले. २०१० साली नक्षलवाद्यांनी याच ठिकाणी पोलीसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये ७६ पोलीस मृत्युमुखी पडले होते. त्याामुळे यावेळी पोलिसांनी काळजी घेत हे दोन शस्त्रसाठे पोलिसांनी जप्त केले आहेत.