नवी दिल्ली- आगामी काळात होत असलेल्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचे भविष्य शुन्यी असणार असल्यातचे मत एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले. गेल्याव काही दिवसांपासून जयराम रमेश मोदींवर टीकेची तोफ डागत असून त्यांच्यावरील एकही टीकेची संधी ते सोडत नाहीत. मोदी हुकुमशाह असल्याचे म्हणत रमेश यांनी मोदींची निवडणुकीनंतर अस्तित्व संपणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना रमेश म्हणाले की, राहुल गांधी यांचा जर आगामी काळातील निवडणुकीत पराभव झाला, तरी त्यांना भविष्य आहे. मोदी यांचे मात्र निवडणुकीनंतर भविष्य अंधारमय आहे. काँग्रेस म्हणजे विशाल हत्ती, तर भाजपा लांडगा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात मतदारांनी भाजपपासून दूर रहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे करून भाजपाने चूक केली असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी भाजपचा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार करत असल्याचं चिदंबरम यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.