जादूई २७२ आकड्यासाठी भाजपची समीकरणे सुरू

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांत सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेला २७२ चा जादुई आकडा कसा गाठता येईल यासाठी भाजपने समीकरणे जुळवाजुळवीला सुरवात केली आहे. मेादींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर देशभरातून मिळत असलेल्या प्रतिसादाने भाजपचा उत्साह द्विगुणित झाला असून पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मोदींच्या सभांना मिळत असलेला प्रतिसादही उत्साहात भर घालतो आहे. मोदींनी आत्तापर्यंत देशात दोन महिन्यात २९ सभा घेतल्या असून अजून ७० सभा ते घेणार आहेत.

निवडणुकांत भाजपने सहा प्रमुख राज्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. गुजराथ, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट* ही ती राज्ये आहेत. या सहा राज्यात २४८ जागा असून त्यातील किमान १३७ जागांची खात्री आत्ताच दिली जात आहे. दिल्लीत ५, छत्तीसगढ मध्ये ९, या जागाही खात्रीच्या मानल्या जात आहेत. मात्र तरीही हा आकडा १५१ वर जातोय. उरलेल्या १२१ जागांसाठी सहयोगी पक्ष अथवा निवडणुकांनंतरच्या युत्या यांचा वापर कसा करून घेता येईल व कोण मदतीला नक्की येऊ शकेल याची गणिते मांडली जात आहेत.

या कामासाठी भाजप स्वतःच्या पक्षाच्या सर्वेक्षणांचा जसा उपयोग करतो आहे तसाच विरोधी पक्षांची सर्वेक्षणे व त्यांचे निष्कर्षही लक्षात घेतले जात आहेत. उत्तरप्रदेशात समाजवादी व काँग्रेसची सर्वेक्षणे सांगतात की समाजवादीला मुलायम, डिंपल व धर्मेंद्र याच जागा राखता येतील तर काँग्रेसच्या सर्वेक्षणानुसार र्कांग्रेसेच सर्व प्रमुख नेते पराभूत होतील. त्यामुळे भाजपने येथे किमान ३७ जागांचे ध्येय ठेवले आहे. हाच आकडा बिहारसाठी १७ , महाराष्ट्रासाठी ३५, राजस्थानसाठी २१, मध्यप्रदेशासाठी २२ व गुजराथसाठी २० असा निश्चित करण्यात आला आहे.

बाकी कमी पडणार्या० जागांसाठी पंजाब, हरियाणा, कर्नाटक, उत्तरांचल, दिल्ली, हिमाचल, गोवा या राज्यांवर भर आहे तर निवडणुकांनंतर भाजपकडे येऊ शकणार्‍या राज्यात तमीळनाडूमधून जयललिता, आंध्रातून चंद्राबाबू व जगमोहन यांच्यावर भरवसा टाकला जाणार आहे. चंद्राबाबू व जगनमोहन यांनी मोदींना समर्थन दिले आहेच तर कर्नाटकात येडियुरप्पा यांनी मोदींना समर्थन जाहीर केले आहे. परिणामी आंध्रातून २५, तमीळनाडूतून ३५ तर कर्नाटकातून किमान १५ जागांचे पाठबळ मिळण्याची आशा आहे. महाराष्ट्रात मनसेने हातमिळवणी करण्याचे संकेत यापूर्वीच दिले असल्याने महाराष्ट्रातून किमान ३५ जागा जिकण्यासाठीची रणनिती आखली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Leave a Comment