रोहित शर्मा- आश्विनने डाव सावरला

कोलकाता- पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी भारताला सुरवातीलाच पाच मोठे धक्के बसले. या धक्कयातून सवारताना पहिल्यांदा कर्णधार धोनी व रोहित शर्माने ७० धावाची भागीदारी केली. धोनी बाद झाल्यानंतर रोहित शर्मा- आश्विनने ८० धावाची भागीदारी करीत चहापानानंतर टीम इंडियाने ६ बाद २४३ धावा केल्यार होत्या. टीम इंडियाने ९ धावाने आघाडी घेतली होती.

दुस-या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर विंडीजचा फिरकी गोलंदाज शेन शिलिंगफोर्डने जोरदार धक्केन दिले. त्यांनी चार फलंदाज बाद करताना टीम इंडियाची मधली फळी कापून काढली. सुरूवातीला शिखर धवन २३ धावांवर, मुरली विजय २६ धावांवर बाद झाला. त्यानतर चेतेश्वर पुजारा १७ धावांवर बाद झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याचा निर्णय मात्र थोडासा वादग्रस्त ठरला.

त्यानंतर लगेचच विराट कोहली ३ धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाची अवसथा ५ बाद ८३ अशी झाली होती. त्याचनंतर कर्णधार धोनी व रोहित शर्माने ७० धावाची भागीदारी केली. महेंद्रसिंह धोनी ४२ धावांवर बाद झाला. त्यावेळी टीम इंडियाच्या ६ बाद १५४ धावा झाल्या होत्या.धोनी बाद झाल्यानंतर रोहित शर्मा- आश्विनने ८० धावाची भागीदारी करीत चहापानानंतर टीम इंडियाचा स्कोंर ६ बाद २४३ धावा झाल्या होत्या. रोहीत शर्मा ६७ धांवा काढून खेळत होता तर आश्विनने नाबाद ४४ धावांवर खेळत होता. टीम इंडियाने ९ धावाने आघाडी घेतली होती.

Leave a Comment