पाटणा – पाटण्याच्या गांधी मैदानावर गेल्या महिन्यात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळच्या बॉम्बस्ङ्गोटाचे खरे लक्ष्य नरेंद्र मोदी हेच होते, मात्र इंडियन मुजाहिद्दीनच्या या अतिरेक्यांना मोदींची हत्या करण्यात यश आले नाही. या मैदानावर बॉम्ब ठेवून पळून जाणारा आरोपी इम्तियाज याला त्याचवेळी पकडण्यात आले आणि त्याचा जबाब घेतला असता त्याने ही माहिती दिली. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनाही मारण्याचा बेत या अतिरेक्यांनी आखला होता, अशी माहिती उघड झाली आहे.
नरेंद्र मोदी गांधी मैदानाच्या लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये उतरले होते आणि सभेच्यावेळी त्यांनी हे हॉटेल सोडले तेव्हाच त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो विङ्गल झाला. त्यांच्यासोबत अनेक पत्रकार होते. ते पाटण्याच्या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी दिल्लीवरून आलेले होते. इंडियन मुजाहिद्दीनचा डाव यशस्वी झाला असता तर या पत्रकारांच्या जीवालाही धोका झाला असता.
या स्ङ्गोटात गुंतलेल्या आरोपींना पाकिस्तानमध्ये बॉम्ब तयार करण्याचे आणि तो पेरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. रियाज भटकल आणि यासीन भटकल या दहशतवादी भावंडांनी इम्तियाजच्या प्रशिक्षणाची सोय केली होती आणि त्याचा खर्च उचलला होता. हा सारा कट पाकिस्तानात रचला गेला. बोधगयेमध्ये याच लोकांनी स्ङ्गोट केले होते.