देशातील चौथ्या नंबरची आयटी कंपनी असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष शिव नाडर यांनी शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी ३००० कोटी रूपयांची देणगी जाहीर केली असून येत्या पाच वर्षात हा निधी दिला जाणार आहे. शिव नाडर फौंडेशन च्या शैक्षिणिक संस्थांना हा निधी सूपूर्द केला जाणार असून फौंडेशनच्या कामकाजासाठी १ अब्ज डॉलर्सची गुंतवणकही केली जाणार आहे.
वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या फौंडेशनच्यावर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या देणगीची घोषणा करण्या तआली. या फौंडेशनतर्फे उत्तर प्रदेशात विद्याज्ञान स्कूल, शिव नाडर युनिव्हर्सिर्टी तसेच तमीळनाडूमधील एसएसएन इन्स्टिट्यूशन या संस्था चालविल्या जातात. भविष्यात जागतिक नेतृत्त्व मिर्नाण करण्यावर या संस्थांतून भर दिला जातो असे सांगून नाडर म्हणाले की १९९४ पासून आत्तापर्यंत या संस्थामधून १८०० कोटींची गुंतवणूक केली गेली आहे. एचसीएल समुहाच्या कंपन्यांच्या शेअर मधून जो लाभांश मिळतो त्याचा विनियोग अशा देणग्यांसाठी केला जातो असेही ते म्हणाले.