कोलकत्ता येथील कसोटी सचिनमय

कोलकाता: मास्टरर बलास्टार सचिन तेंडूलकर खेळत असलेल्या अखेरच्या कसोटी मालिका बुधवारपासून सुरूवात झाली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेचा पहिला सामना कोलकात्यात खेळवला जाईल. मास्टर ब्लास्टर या कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात खेळताना पुन्हा दिसणार नाही. त्यामुळे कोलकत्ता येथील सामना पूर्णपणे सचिनमय झाला असून स्टेडियमच नाही, तर अख्खं कोलकाता शहर सचिनमय झाले आहे.

सचिनच्या कारकीर्दीतली १९९व्या कसोटीचा यजनमानपदाचा मान ईडन गार्डन्सला मिळाला आहे. ‘सिटी ऑफ जॉय’ अशी ओळख असलेल्या कोलकाता शहरावरही ‘सचिन मॅनिया’ असल्याचं जाणवत आहे. सचिनच्या अखेरच्या कसोटी मालिकेसाठी कोलकाता शहरामध्ये जणू ‘सचिन तेंडुलकर कार्निव्हल’ सुरू असल्याचे चित्र आहे.

मास्टर ब्लास्टर या कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात खेळताना पुन्हा दिसणार नाही. सचिनच्या कारकीर्दीतली दोनशेवी आणि अखेरची कसोटी मुंबईत खेळवली जाईल, तर १९९व्या कसोटीच्या यजमानपदाचा मान ईडन गार्डन्सला मिळाला आहे. स्टेडियमच नाही, तर अख्खे कोलकाता शहर सचिनमय झाले आहे. सर्वाधिक उत्सुकता आहे, ती सचिनची या कसोटीतील कामगिरी. मास्टर ब्लास्टर आपल्या चाहत्यांना जाता जाता शतकाचं गिफ्ट देणार का? याविषयी.

जानेवारी २०११मध्ये सचिनने दक्षिण आफ्रिकेत केप टाऊन कसोटीत १४६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर सचिनने कसोटीत चार महत्त्वाच्या अर्धशतकी खेळी केल्या. गेल्या वर्षी ईडन गार्डन्सवरच त्याने इंग्लंडविरुद्ध ७६ धावा केल्या होत्या.

Leave a Comment