ओसामाचा पत्ता दिला -२५ दशलक्ष डॉलर्स द्या

अमेरिकेला हवा असलेला नंबर एकचा दहशतवादी, अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा आपण २००३ सालीच एफबीआय एजंटला दिला होता व त्यामुळे ओसामाचा ठावठिकाणा सांगण्याबद्ल जाहीर करण्यात आलेली २५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम बक्षीस म्हणून दिली जावी अशी मागणी अमेरिकेतील हिरे व्यापार्‍याने त्याच्या वकीलामार्फत केली आहे.

टॉम ली असे या व्यापार्‍याचे नांव असून त्याच्या म्हणण्याप्रमाणे २०११ मध्ये ओसामाला अमेरिकन सील कमांडोनी पाकिस्तानात ठार केले. मात्र २००३ सालीच त्याने ओसामा पाकिस्तानच्या पेशावर मध्ये लपला असल्याची माहिती एफबीआय एजंटला दिली होती. मात्र त्यावरही अमेरिकेने आठ वर्षे वाया घालविली आणि याच जागी ओसामाला ठार केले असा दावा त्याने केला आहे. त्याला ही माहिती त्याच्या परिचयातील पाक इंटेलिजन्स एजंटकडून मिळाली होती असे त्याचे म्हणणे आहे.

एफबीआयचे डायेक्टर जेम्स कॉने यांनी मात्र ओसामाचा ठावठिकाणा गुप्तहेरांनी शोधला असल्याचे सांगत ली याचा दावा जरी ओसामाची माहिती दिल्याबद्दल असला तरी मुळात जेथे ओसामाला मारले गेले त्या अबोटाबादेतील घर २००५ पर्यंत बांधलेच गेले नव्हते असा खुलासा केला आहे. परिणामी ली ला बक्षीसाची रक्कम देता येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment