जास्त झोपे जास्त जगे

आपली प्रकृती आणि आरोग्य पूर्णपणे झोपेवर अवलंबून असते. त्यामुळे आरोग्य चांगले राखायचे असेल तर झोपेच्या बाबतीत जागरूक रहा, असा इशारा संशोधक वारंवार देत असतात. झोप ही गोष्ट आपल्या आयुष्यात एवढी महत्वाची असते की अनेक संशोधकांनी झोपेवर प्रदीर्घ काळ संशोधन केलेले आहे. ब्रिटनमध्ये सरे प्रांतात सरे स्लिप रिसर्च सेंटर अशी केवळ झोपेवर संशोधन करणारी संस्थाच स्थापन झालेली आहे. सध्याच्या लोकांना दगदग ङ्गार करावी लागते. झोपेच्या आणि जेवणार्‍या ठराविक वेळा राखता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक विकार प्रविष्ट होतात आणि आरोग्यदायी जीवनाचे सारे चक्रच बिघडून जाते. सरे स्लिप रिसर्च इन्स्टिट्यूटने तर असा निष्कर्ष काढला आहे की, माणसाचे आरोग्य हे त्याच्या जनुकांवर अवलंबून असते.

माता-पित्यांकडून निरोगी जीवनाचा वारसा माणसाला मिळालेला असतो. परंतु तो झोपेकडे दुर्लक्ष करायला लागला आणि शरीराला पुरेशी विश्रांती देईनासा झाला की, वारशाने मिळालेली निरोगी जनुके सुद्धा बिघडून जातात आणि मुलभूत बदल होऊन माणूस जन्मत: मिळालेला निरोगीपणा गमावून बसतो. त्यातून नैराश्य, तणाव, लठ्ठपणा, मधुमेह आणि एवढेच नव्हे तर हृदयरोग सुद्धा त्याला ग्रासून टाकतात. अशा प्रकारचे हे संशोधन एवढे सखोल असले तरी हे संशोधक सांगतात तो उपाय मात्र सोपा आहे.

त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, रोज किमान सहा ते सात तास झोप घ्याच. आठ तास छान झोप लागत असेल आणि नियमाने आठ तास झोपण्याची सवय असेल तर उत्तमच. परंतु किमान सहा ते सात तास झोप तर आवश्यकच असते. असे असले तरी प्रत्येकाचे आयुष्य काही आखीव-रेखीव नसते. त्यामुळे झोपण्याच्या वेळा रोज सांभाळल्याच जातील आणि सात तास झोप मिळेलच याची काही खात्री देता येत नाही. अशावेळी एखादा दिवस थोडी झोप कमी झाली म्हणून काही ङ्गार बिघडत नाही.

मात्र सलगपणे काही दिवस असे सहा तासापेक्षा कमी झोपणे हे आरोग्यासाठी ङ्गार घातक असते. सध्याच्या काळामध्ये लोक दिवसभर बाहेर ङ्गिरतात आणि घरी आल्यानंतर रात्री उशीरापर्यंत नेटसर्ङ्गिंग करत राहतात. ही सवय ङ्गार वाईट आहे. अशा सवयी सोडून जे लोक किमान सहा ते जास्तीत जास्त आठ तास दररोज नियमाने झोप घेतात ते अधिक जगतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही