राहुल गांधींना मिळाली फक्त चार दिवसांची मुदत

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसीचे उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी सात दिवसांची मुदत मागितली असली तरी आयोगाने मात्र त्यांना ङ्गक्त चार दिवसांची मुदत मंजूर केली आहे. तेव्हा आता राहुल गांधी यांना येत्या गुरुवारपर्यंत या नोटिसीला उत्तर द्यावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही मुदत देताना सुद्धा केवळ दिवाळीचा विचार करून ती दिली आहे. दिवाळी नसती तर या नोटिसीचे उत्तर कालच द्यावे लागले असते.

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्ङ्गरनगरच्या दंगलीच्या संदर्भात मध्य प्रदेशातील इंदौर आणि राजस्थानातील चुरू येथील जाहीर सभांत बोलताना केलेल्या विधानांवरून त्यांना आचारसंहिता भंगाची ही नोटीस देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ही नोटीस दिली गेली. आपल्याला ही नोटीस ३१ तारखेलाच मिळालेली आहे आणि तिचे उत्तर चार तारखेला द्यायचे होते. ही मुदत पुरेशी नसल्यामुळे आपण मुदतवाढ मागत आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टीने केलेल्या तक्रारीवरून ही नोटीस देण्यात आलेली आहे आणि भाजपाने या तक्रारीमध्ये कॉंग्रेसची मान्यता काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अर्थात निवडणूक आयोगाने अद्याप तरी केवळ राहुल गांधी यांना लक्ष्य करून नोटीस पाठविलेली आहे.

Leave a Comment