तणाव कमी करणारी बागेतली चक्कर

मानवी मेंदूला तणाव जाणवतो. किंबहुना आजच्या जीवन पद्धतीमध्ये तणाव अपरिहार्य ठरला आहे. परंतु शास्त्रज्ञांना मानवी मेंदूचा हाही गुणधर्म माहीत आहे की, ज्यामुळे तणावग्रस्त मेंदू पुन्हा शांत सुद्धा होऊ शकतो. सततचे आवाज, मानसिक अशांतता आणि दगदग यामुळे माणूस चिडचिडा होऊन जातो आणि त्यामुळे मेंदू शिणतो. या शिणलेल्या मेंदूवर काय इलाज करावा, यावर शास्त्रज्ञांचे अनेक प्रयोग चालू आहेत आणि साहजिकच मन:शांती देणार्‍या गोळ्या बाजारात येत आहेत. गोळ्या घेतल्याने मन:शांती मिळू शकेलही. परंतु ती तात्पुरती असेल. कारण मेंदूवरचा तणाव वाढला की, शरीरामध्ये काही विशिष्ट द्रव्ये पाझरायला लागतात आणि औषधाने या द्रव्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे तणाव कमी होत नाही, आहे तिथेच राहतो.

तणावाला कारणीभूत ठरणारी मन:स्थितीही तशीच राहते. तणावाच्या परिणामावर औषध दिले जाते. या गोळ्यांचा प्रभाव संपला आणि पाझरलेली द्रव्ये कमी झाली की, पुन्हा तणाव उङ्गाळून वर येतो. म्हणजे हा तात्पुरता उपाय आहे आणि ती परिस्थिती कायम रहावी यासाठी एकामागे एक गोळ्या घेत रहावे लागते. यावर कायमचा खरा इलाज करायचा असेल तर तणावाच्या मुळाशी म्हणजे मन:स्थितीजवळ जावे लागेल आणि ती बदलावी लागेल. मन:स्थिती बदलणे म्हणजे मुळावर घाव घालणे आणि तसे झाले की, चिडचिडेपणावर कायमचा इलाज होतो.

तसा इलाज म्हणजे दाट झाडी असलेल्या भागातून पायी ङ्गिरणे. विशेषत: अशा झाडांच्या खाली भरपूर पाला-पाचोळा पडला असेल तर त्यावरून जरूर चालावे. सडकेवरून पायात शूज घालून ङ्गेरङ्गटका मारला तर शरीर आणि चित्तवृत्ती प्रङ्गुल्लित होतात हे खरे, परंतु उघड्या पायांनी झाडाखाली पडलेल्या पाला-पाचोळ्यावरून चालण्याने त्यापेक्षा अधिक प्रमाणात तणाव कमी होतो. अशा चालण्याने पानांचा आणि पाचोळ्याचा जो आवाज होतो त्या आवाजा व्यतिरिक्त त्या परिसरात काहीही असता कामा नये. म्हणजे पाचोळ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला पाहिजे. तो ऐकू यायला लागला की, आपले लक्ष त्या केवळ आवाजावरच केंद्रित होते आणि मनातले अन्य विचार दूर सारले जातात. मेडिटेशन किंवा ध्यानामध्ये नेमके असेच होत असते. त्यामुळे ध्यानात शांती लाभते, तसेच या ङ्गेरङ्गटक्याने सुद्धा शांतीचा लाभ होतो, तणाव निवळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment