भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली

बंगळूरु – सातव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 57 धावांनी पराभवकरुन भारताने मालिका 3-2 अशी जिंकली. प्रथम फलंदाजीकरुन भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 384 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव 326 धावांत संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकन 116 धावा केल्या. मात्र अन्य कोणत्याही फलंदाजास मोठी खेळी करता आली नाही. द्विशतक करणा-या रोहित शर्माला सामना आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याआधी भारताच्या रोहित शर्माने बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आणखी एक विक्रम रचला.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरे द्विशतक झळकावत शर्माने भारताच्या डावाला आकार दिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. धवन 60 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली शून्यावर बाद झाला. तर सुरेश रैना(28) आणि युवराज सिंग(12) स्वस्तात बाद झाले. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले तरी रोहित शर्माने एका बाजूने धावा सुरु होत्या. युवराज बाद झाल्यानंतर शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने अखेरच्या काही षटकात धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली.

दरम्यान रोहितने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरे द्विशतक झळकावले. विशेष म्हणजे याआधीचे दोन्ही द्विशतके भारताच्या क्रिकेटपटूंनी केली आहेत. रोहितने 158 चेंडूत 16 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 209 धावा केल्या. तर ढोणीने 38 चेंडूत 68 धावा केल्या. सात सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाल्याने या सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरुप आले आहे.

रोहितने झळकावली डबल सेंच्युरी

भारतीय टीमचा तडाखेबाज फलंदाज आणि मुंबईकर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधातल्या सातव्या वनडे मॅचमध्ये रन्सची आतषबाजी करत दिवाळी साजरी केलीय. बंगळूरच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर रोहितने तडाखेबाज बॅटिंग करत 158 बॉल्सचा सामना करत तब्बल 16 सिक्स आणि 14 फोर ठोकत 209 रन्सची विक्रमी खेळी केली आहे. वनडे मॅचमध्ये दुसरी सेंच्युरी झळकावणार रोहित शर्मा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी डबल सेंच्युरी झळकावली होती. तसंच रोहितने ऑस्ट्रेलियाचा बॅटसमन वॉटसनचाही 15 सिक्सचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये सलग दोन सिक्स लावून रोहितने आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली. मात्र अखेरच्या ओव्हरच्या तिसर्‍या बॉलवर तो आऊट झाला.

Leave a Comment