पुण्यावर आसणार १२८५ सीसीटीव्हीचा वॉच

पुणे: आगामी काळात पुण्याावर १२८५ सीसीटीव्हीचा वॉच आसणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर आता पुण्यातही ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पुण्यात १२८५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रोजेक्टला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

२८ ऑक्टोंबरपासून या प्रोजेक्टला सुरुवात झाली आहे. पुण्यात ४४० ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. हाय रेज्युलेशन असलेले हे कॅमेरे ४२ आठवड्यांत संपूर्ण पुणे शहरात बसवले जातील. चार झोनचा हा प्रोजेक्ट दोन फेजमध्ये पूर्ण होणार आहे.

झोन एक मध्ये पुणे सिटी, डेक्कन, विश्राम बागचा समावेश आहे. हा प्रोजेक्ट २६ आठवड्यात पूर्ण होईल. तर झोन दोनमध्ये स्वारगेट, लष्कर, झोनतीनमध्ये पिंपरी, चतुर्श्रुंगी, झोन चार मध्ये खडक, वानवडीचा समावेश आहे. या प्रोजेक्टसाठी पुणे पोलिस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये अत्याधुनिक कंट्रोल रुमही बनवण्यात येणार आहे.

Leave a Comment