वजन कमी करणारी दशसूत्रे

भारतीय अन्न पदार्थ हे जाडी वाढवणारे आणि उष्मांकानी परिपूर्ण असतात असा सर्वांचाच समज आहे पण या अन्नात घातले जाणारे असे काही मसाले आहेत की, त्यांच्यात वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे. पण हा गुण माहीत नसलेले आणि त्यांच्याविषयी गैरसमज असलेल्या लोकांत वजन कमी करण्यासाठी सलाड खाणे, भाकरी न खाणे असे काही उपचार सुरू केले आहेत. काय खायचे आणि काय खायचे नाही याची त्यांची एक मोठी यादीच असते. पण आता काही तज्ञांनी असे सांगायला सुरूवात केली आहे की वजन कमी करण्यासाठी ङ्गार काही करण्याची गरज नाही. वर्ज्य पदार्थांची यादी न करता सारे काही खावे पण खाली दिलेले दहा पदार्थ आपल्या खाण्यात हमखास येतील याची दक्षता घ्यावी तर वजन आपोआप नियंत्रणात राहील. त्यांच्यात जादा उष्मांक जाळण्याची मोठीच ताकद असते असे आढळले आहेे. तेव्हा खायचे ते खा आणि वजन वाढू नये यासाठी या दहा वस्तू आपल्या खाण्यात आवर्जुन समाविष्ट करा म्हणजे नो टेन्शन. त्या दहा वस्तू अशा आहेत पण त्यांच्या या गुणधर्माची ङ्गार चर्चा झालेली नाही.

१. हळद – सर्व पदार्थात मिसळली जाते. ती कर्करोगप्रतिबंधक, जंतुनाशक, वजन कमी करणारी आहे. हळदीतला कर्कुमीन हा घटक त्यादृष्टीने ङ्गार प्रभावी आहे. हळद रक्तदाबही कमी करते २. लसूण – लसणात ङ्गार औषधी गुणधर्म आहेत. धर्माने त्याला वर्ज्य का ठरवले आहे हे काही समजत नाही पण, त्यातले ऍलिसीन हे द्रव्य वजन कमी करणारे आहे. ते जादा चरबी कमी करते. ३. विलायची – याचा वापर केवळ वासासाठीच होतो असे नाही तर जादा कॅलरी जाळण्यासाठीही होतो.४ मोहरीचे तेल – हे तेल आहे पण अन्य तेलासारखे ते जादा ङ्गॅटस् युक्त नाही. ५.मध -सकाळी पाण्यासोबत पिल्याने वजन कमी होते.

६.कडी पाला- कडुनिंबाचा पाला अनेक गुणधमार्र्ंनी युक्त तसाच हा कडीपालाही गुणी आहे. ७ मिरची – भारतभर वापरली जाणारी मिरची आणि लाल मिरचीची पावडर वजन कमी करण्यास मदत करते कारण तिच्यात ते घट असतात.८.उसळ – यात अशी जीवनसत्त्वे आहेत की ज्यांनी वजन घटते. ९ कोबी – आणि ज्चारी तसेच एकदल धान्ये हीही माणसाला वजन कमी करण्यास मदत करतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment