हॉलिवुडच्या तोडीचा सुपरहिरो

दिवाळी म्हटलं की शाहरूख खानचा चित्रपट येणार हे फिक्स असते, यंदाच वर्षे मात्र याला अपवाद ठरले आहे. एसआरकेचा ‘चेन्नाई एक्सप्रेस’ सलना खानच्या फेव्हरेट मुहर्तावर म्हणजेच ईदच्या मुहर्तावर प्रदर्शित करण्यात आला. तर दिवाळीच्या मुहर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला बच्चे कंपनीचा लाडका सुपरहिरो ‘क्रिश 3’ आला आहे. या चित्रपटाच वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेल तंत्रज्ञान. क्रिश सिरिजचा पहिला म्हणजे ‘कोई मिल गया’ त्यान्नंतर आलेला क्रिश आता त्याच्या पुढची कथा ‘क्रिश 3’ मध्ये मांडण्यात आली आहे.

क्रिशमध्ये खलनायक डॉ. सिद्धांत आर्या (नसिरुद्दीन शाह) यांना मात दिल्यानंतर कृष्णा (ऋतिक रोशन) आपले वडील रोहित (ऋतिक रोशन) यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढतो. यानंतर तो आपली प्रेयसी प्रिया (प्रियंका चोप्रा) सोबत लग्न करून कौटुंबिक सुखात रममान झाला आहे. मात्र हे करीत असताना तो आपल्या तत्त्वाप्रमाणे वाईट लोकांविरूदधची लढाई लढत आहे. याचबरोबर तो विज्ञानाच्या मदतीने असे काही तंत्रज्ञान विकसित करु इच्छित आहे ज्याद्वारे त्याला वाटते की समाजाचा विकास झाला पाहिजे. तर दुसरीकडे काल (विवेक ओबेरॉय) अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे. जो समाजात तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन वाईट गोष्टी पसरवू पाहतो आहे. त्याच्याकडे द्भुत ताकद आहे त्या ताकदीचा वापर वाईट व खळबळजनक करण्याकरिता करीत असतो. त्याच्या या तालमीत आहे त्यानेच तयार केलेले म्यूटेंट्स. ज्यांच्या काही सवयी माणसासारख्या आहेत तर काही प्राण्यासारख्या. म्यूटेंट्सच्या मदतीने काल असा एक डाव रचतो ज्यामुळे जगाचा विनाश होण्याची शक्यता आहे. अशावेळी कृष्णा आणि त्याचे वडील रोहित या विनाशापासून जगाला वाचवितात.

पण एकदम आलेल्या भयावह संकटावर कशी मात करायची हे सूचत नाही. त्यामुळे या दरम्यान त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. मग काय वाईटाचा नाश करण्यासाठी चांगले लोक यशस्वी होतात का? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी क्रिश ला चित्रपटगृहात जाऊन भेटायला हवं. ‘क्रिश 3’मध्ये दिग्दर्शक राकेश रोशनने मनोरंजनाचा सगळा मसाला ठासून भरलाय. यातील काही दृश्य हॉलिवूडला टक्कर देण्याच्या तोडीची आहेत. सुपरहिरोंच्या चित्रपटाचा शेवट काय होणार याची आपल्याला माहिती असते कारण त्यामध्ये चांगल्याचा विजय ठरलेला असतो. चित्रपटात काही कमतरता आहेत, त्यामुळे हा चित्रपट मध्यतापुर्वी फारच रेंगाळला आहे उत्तरार्धात मात्र दिग्दर्शकाने जबरदस्त कमबॅक केले आहे. राकेश रोशनने यांनी हा चित्रपट करताना तंत्रज्ञानावरच जास्त मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्याचा फायदा चित्रपटाला होणार आहे.

राकेश रोशन यांना दिग्दर्शनाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याचाही प्रभाव जाणवतो. क्रिश सीरीजमधील पहिले चित्रपट मुलांना व कौटुंबिक प्रेक्षकांना खास आवडले होते तोच वर्ग धरून पुन्हा डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली आहे. चित्रपट पुर्णपणे ऋतिक रोशन भोवती फिरणारा आहे. तो सुपरहिरोच्या कॉस्च्युममध्ये आणखीनच भाव खाऊन जातो. अ‍ॅक्शनदृश्यं करताना ती स्वाभाविक दिसतील याचीही काळजी त्यानं घेतलीय. पडद्यावर तिहेरी भुमिका साकारणे अवघड काम आहे मात्र ऋतिकने हे आव्हान लिलया पेलले आहे. रोहित, कृष्णा आणि सुपरहीरो क्रिश या तीनही भुमिकासाठी त्याने आपले सर्वोत्तम अभिनय कौशल्य पणाला लावले आहे.

निगेटिव रोलमध्ये विवेक ओबेरॉय एकदम फिट बसला आहे. विवेकने याआधीही खलनायकाची भूमिका साकारल्या आहेत. विवेक नायकाच्या भुमिकेपेक्षा खलनायकाच्या भूमिकेतच आपली छाप पाडतो हे यानिमिताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रियाच्या भुमीकेतील प्रियांकाला फार काही करण्याला वाव नाही. ‘काया’च्या रुपात कंगना राणावतने खूपच उठावदार कामगिरी केली आहे. चित्रपटाच संगीत फारच कमकुवत आहे, राजेश रोशन यांनी यावेळी रसिकांची निराशा केली आहे, सलिम – सुलेमान यांनी दिलेले पार्श्‍वसंगीत संगीत मात्र जबरदस्त आहे. गाण्यच्या चित्रिकरणासाठी निवडलेली लोकेशन्स सुंदर आहेत. एकंदरीत हॉलिवुडच्या तोडीचे धमाल तांत्रीक अविष्कार असलेला ‘क्रिश 3’बच्चे कंपनी बरोबरच मोठ्यांनीही दिवाळीच्या सुट्टीत निखळ मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी बघायला हवा.

चित्रपट – क्रिश 3

निर्माता, दिग्दर्शक – राकेश रोशन

संगीत – राजेश रोशन

कलाकार – ऋत्विक रोशन, विवेक ओबेरॉय, कंगना रानावत, प्रियंका चोप्रा, राजपाल यादव

रेटिंग – * * *

 

Leave a Comment