माधूरीसोबत काम केल्याने हुमा कुरैशी खूष

बॉलीवुडची अभिनेत्री हुमा कुरैशीने धकधक गर्ल माधुरी दीक्षित ‘डेढ़ इश्किया’ मध्ये काम केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने माधूरी सोबत काम करता आल्याने अभिनेत्री हूमा कुरेशी गेल्या काही दिवसांपासून खूपच खूष आहे.

‘गैंग्स ऑफ वासेपुर’ या सिनेमापासून सिने करियरची सुरूवात हुमा कुरैशीने केली आहे. माधूरी सोबत काम करताना आलेला अनुभव सांगताना हूमा म्हणाली, ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमात काम करण्याचा प्रस्तााव माझ्यासमोर ठेवण्यात आल्याने मी खूपच खूष झाले. प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते की, माधुरी सोबत काम करण्याची संधी मिळावी. ही संधी मला मिळाल्याने मी खूपच खूष असल्याचे तिने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

‘गैंग्स ऑफ वासेपुर’ च्या इमेजमुळे मी थोडीसी बोर झाली आहे. या सिनेमातील टाइपकास्ट भूमिका पाहता हे काम रिपीट करण्याची इच्छा नाही. आगामी काळात मला सिनेमात काम करताना वेगवेगळया भूमिका साकार करायच्या आसल्यााचेही हूमाने यावेळी बोलताना स्पष्ट केले. ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमात माधुरी दीक्षित, नसीरुद्दीन शाह, अरशद वारसी आणि हुमा कुरैशीची मुख्य भूमिका आहे.