तुमचा इंटरेस्ट ओळखून शूटिंग करणारा कॅमेरा

वॉशिग्टन – आपण अंगावर सहज वागवू शकू आणि आपण जे दृष्य पाहतो आहोत ते आपल्याला आवडते आहे असे लक्षात येताच त्वरीत त्याचे रेकॉडिंग आणि शूटिंग सुरू करणारा कॅमेरा जपानच्या न्यूरोवेअर कंपनीने तयार केला आहे. न्यूरोकॅम असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

संधोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या कॅमेर्‍यात सेन्सर बसविले गेले आहेत. हे सेन्सर आपल्या मेंदूत होत असलेल्या इलेक्ट्रीक हालचाली त्वरीत ओळखतात त्या नोंदवितात आणि त्यात किती बदल होतोय याचेही गणित मांडतात. त्यासाठी या हालचालींचे वर्गीकरण १ ते १०० असे केले गेले आहे. हा आकडा ६० च्या पुढे असेल तर तुम्ही जे पाहाताय त्यात तुम्हाला रस आहे याची नोंद त्वरीत घेतली जाऊन संबंधित दृष्याचे रेकॉडिंग कॅमेरा सुरू करतो. पाच सेकंदात हे रेकॉडिंग सुरू होते तसेच त्यासाठी वापरल्या गेलेल्या ग्राफिक इंटरचेंज फॉमॅट चीपवर त्या दिवसाची तारीख, व लेाकेशनची नोंद केली जाते. हे रेकॉडिंग व्हिडीओ अल्बममध्ये स्टोअर केले जाते. ते तुम्ही पुन्हापुन्हा पाहू शकता.

यात मॅन्यूअल मोडही दिला गेला आहे. या कॅमेर्‍यात इंटिग्रेडेट स्मार्टफोन वापरला गेला असून तो माणसाच्या मेंदूसारखेच काम करतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment