एलआयसी ला मिळाली पहिली महिला एम.डी.

नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्बिमा महामंडळात प्रथमच महिला व्यवस्थापकीय संचालिका नियुक्त करण्यात आली असून उषा संगवान असे त्यांचे नांव आहे. त्याचबरोबर एलआयसी हाऊसिंग च्या व्यवस्थापकीय संचालकपदी व्ही.के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोघेही निवृत्तीपर्यंत या पदावर राहणार आहेत.

भारतीय आयुर्विमा महामंडळात विविध भागांसाठी एकूण चार व्यवस्थापकीय संचालक व एक अध्यक्ष नेमले जातात. गेली दोन वर्षे यापैकी दोन पदे रिकामी होती. त्यावर उषा संगवान आणि व्ही.के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी आता विमा मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यास मदत मिळणार आहे. एस.बी. जैनक आणि सुशोभन सरकार यांची यापूर्वीच व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली गेली आहे तर अध्यक्षपदी एस. के. रॉय हे आहेत.

एप्रिल महिन्यातच या पदांसाठीच्या मुलाखती सरकारतर्फे घेण्यात आल्या होत्या. भारताची सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या आयुर्विमा महामंडळाचा पॉलिसी व्यवसायात बाजारातील हिस्सा ८३ टक्के इतका आहे तर प्रिमियम मधील हिस्सा ७१ टक्के आहे. मंडळातेन २०१२-१३ सालात ७६२.४५ अब्ज रूपयांचा व्यवसाय केला आहे.

Leave a Comment