आधारकार्डविना मिळणार गॅस सबसिडी

नवी दिल्ली- एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांच्याकडे अद्याप आधार कार्ड नाही अशा सगळ्या घरगुती गॅस ग्राहकांना सबसिडीची रक्कम मिळणार असल्याचे एका तेल कंपनीने म्हटले आहे.

आता आधार कार्ड नसलेल्या ग्राहकांनाही सबसिडीची रक्कम मिळणार असल्याचे तेल कंपनी महामंडळाचे संचालक आंद्रजित बोस यांनी सांगितले. ज्या लोकांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही त्यांना सबसिडीची रक्कम मिळणार नसल्याची वृत्त खोट असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड असलेल्या ग्राहकांनाच सबसिडीची रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र या वृत्ताने गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment