
वॉशिग्टन – अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यंदा प्रथमच व्हाईट हाऊसमध्ये साजर्या केल्या जाणार्या दिवाळीचे यजमानपद भूषविणार आहेत. अमेरिकन संसदेने दिवाळी हा भारतीयांचा महत्त्वाचा सण असल्याचे मान्य करून नुकतीच संसदेत दिवाळी साजरी करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
संसदेप्रमाणेच अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसवरही ५ नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. मिशेल ओबामा यांच्याकडे या समारंभाचे यजमानपद असून या कार्यक्रमाला लॉमेकर, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी व कांही प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.