रणवीर सिंह पसरावितो अफवा

गेल्यास काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या अफेयरची चर्चा आहे. त्यांच्या अफेयरची नेहमीच चर्चा का असते या प्रश्नांचे उत्तर रणवीर सिंह हे आहे. दोघांच्या बाबतीत होत असलेल्या चर्चेला हवा देण्याचे काम खुद़द अभिनेता रणवीर सिंहच करीत असतो हे आता उघड झाले आहे.

काही दिवसांपूवी रणवीर सिंह ज्यावेळी आजारी पडला होता. त्यावेळी त्याला काहीही झाले नव्हते तर त्याला लवेरिया झाला होता. त्यावेळी रणवीरला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली त्या‍वेळी घरी सोडण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादूकोन घरापर्यंत आली होती. त्या‍वेळी इंटरव्यूच्या वेळी रणवीरने तिला जास्त रिस्पॉन्सिबल होण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

तसे पाहिलेतर सुरुवातीपासूनच रणवीर आणि दीपिकाच्या संबधाबाबत बोलताना दीपिकाने गप्प राहणे पसंत केले आहे. विशेषता मीडियाच्या समोर तर तिने कधीच तोंड उघडले नाही. दोघांच्या अफेयरची अफवा त्यावेळी पसरली होती. ज्यावेळी दोघेजण एक होटेलमधील लेट नाइट पार्टीत रणवीर आणि दीपिकाला एकमेकाच्या खूप जवळ काही जणांनी पाहिले होते. त्यावेळेसपासून या दोघांच्या अफेयरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सर्व अफवा पसराविण्यात मात्र नेहमीच रणवीर आघाडीवर असतो.

Leave a Comment