पळालेला पाटणा स्फोटाचा संशयित आरोपी पुन्हा जेरबंद

नवी दिल्ली – पाटणा साखळी स्फोटांप्रकरणातील फरार झालेला संशयित आरोपी पुन्हा जेरबंद झाला आहे. महर ए आलमला कानपूरजवळ रेल्वे पोलिसांनी पकडलं. बिहरमधल्या मुझ्झफ्फरपूरमधून बुधवारी रात्री महर ए आलम एनआयएच्या तावडीतून पसार झाला होता.

आलमला मुज्जफ्फरमधल्याच एका गेस्ट हाऊसमध्ये बसवण्यात आलं होतं. तिथूनच तो फरार झाल्याचं पीटीआयनं म्हटलं. आलम हा इंडियन मुजाहिदीनच्या तेहसीन अख्तर या दहशतवाद्याचा प्रमुख साथीदार आहे. तेहसीन स्वतः पाटण्यातल्या साखळी स्फोटांमागचा मुख्य सुत्रधार मानला जातोय. साखळी स्फोटात 6 लोक ठार झाले असून 80 जण जखमी आहेत.