नरेंद्र मोदी आज पुण्यात

पुणे: भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज पुण्या त सभा होणार आहे. लोहगाव विमानतळा शेजारील मैदानावरून ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यासोबत शुक्रवारी त्यांच्या हस्तेे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमासाठी ते पुण्यात दाखल होणार आहेत.

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमानंतर मोदी गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करतील.
मोदींच्या स्वागतासाठी पुणे भाजपकडून छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विमानतळालगतच एक मंच उभारण्यात आला आहे. येथे मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

बिहारच्या पाटणामध्ये नुकत्याच सभेपूर्वी झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोदींसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचे ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील तिथे कडोकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. १५००हून अधिक पोलिस मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Comment