अजय सोबत तुषार करणार सिनेमा

बॉलीवुडचा अभिनेता तुषार कपूर आगामी काळात सिंघम स्टार अजय देवगनला सोबत घेवून नवीन सिनेमाची निर्मिती करणार आहे. आगामी काळात तुषार कपूर फैशन डिजायनर शबीना खानला सोबत घेवून सिनेमाची निर्मीती करणार आहे.

शबीना ही तुषार कपूरची मानलेली बहीण असून फिल्मकार एकता कपूरची एकदम जवळची मैत्रीण आहे. याबाबत बोलताना शबीना म्हाणाली, आगामी काळात मी अभिनेता तुषार कपूर सोबत एक सिनेमा घेवून येत असून त्याामध्ये अभिनेता अजय देवगन यांची मुख्य भूमिका असणार आहे.

या सिनेमाची शुटिंग पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट तयार करण्याचे काम सध्या सुरू असून लवकरचे हे काम पूर्ण होईल असे शबानाने बोलताना सांगितले. यापूर्वी तुषारने अभिनेता अजय सोबत ‘गोलमाल’ सीरीजचा सिनेमात काम केले होते. त्यामुळे दोघातील मैत्रीपूर्ण संबध जुळले आहेत.

Leave a Comment