सचिन येणार पोस्टाच्या तिकीटावर

मुंबई – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन आपली शेवटची २०० वी कसोटी वानखेडेवर खेळून क्रिकेटला रामराम करणार आहे. त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने या महान बल्लेबाजावर कसोटी सुरू होणार असलेल्या दिवशीच त्याचा फोटो असलेले एक पोस्ट तिकीट प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 या मॅचच्या टॉससाठीही विशेष नाणे वापरले जाणार असून नंतर एमसीए ते नाणे सांभाळून ठेवणार आहे. याच दिवशी सचिनवर आलेले लेख, त्याचे व्यवसाय, क्रिडा पत्रकारांनी त्याच्या विषयी व्यत्त* केलेली मते असलेली ६४ पानी पुस्तिकाही प्रकाशित केली जाणार असून या पुस्तिकेच्या प्रती मर्यादित आहेत आणि ती पुस्तिका व नाणी एमसीए व बीसीसीआय सदस्यांना वाटली जाणार आहेत.

सचिनच्या या शेवटच्या कसोटीत दररोज १० हजार मुखवटे, सचिनचा फोटो असलेली १० हजार स्कोअर कार्ड व सचिनचे चित्र असलेल्या १० हजार टोप्याही वाटल्या जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment