धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच राहणार – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच राहणार आहे, तिसरी आघाडी वैगरे काही नसेल, आमची काँग्रेसबरोबरची आघाडी कायम राहणार आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे तिसर्‍या आघाडीतील राष्ट्रवादी सामील होईल या शक्यतेला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दिल्लीत तिसर्‍या आघाडीची सभा झाली, या सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डीपी त्रिपाठी उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र शरद पवारांनी आपण काँग्रेससोबत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment