इंडिजविरुद्ध भारतीय संघ जाहीर

मुंबई- वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. यात नवोदित शामी अहमद, उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांचीही निवड केली असून झहीर खान, हरभजनसिंग यांना वगळून इशांत शर्मा याला संघात पुन्हा स्थान दिले आहे. तर मध्यमगती डावखुरा गोलंदाज झहीर खानसह फिरकीपटू रवींद्र जाडेजाला संघातून वगळण्यात आले आहे.

दुखापतीमुळे जडेजाला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी अमित मिश्राला स्थान दिले आहे. तर रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करणा-या झहीर खान आणि हरभजनसिंग यांना वगळले आहे. निवड समितीचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीने ही संघ निवड केली. भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकाता आणि मुंबईत कसोटी सामने खेळणार आहे.

भारतीय संघ- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, शामी अहमद, रोहित शर्मा आणि इशांत शर्मा.

Leave a Comment