शेअर बाजारात विक्रमी तेजी

मुंबई – शेअर बाजारात गेल्या बुधवारी (तारीख ३० ऑक्टोबर) दिवाळीच्या तीन दिवस आधीच तेजीचे ङ्गटाके उडवून दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात न भूतो एवढी तेजी दिसली. निर्देशांकाने नवा उच्चांक गाठला असला तरी लघु गुंतवणूकदारांनी ङ्गार हुरळून जाण्याची गरज नाही, उलट सावध राहण्याची गरज आहे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ऑटोमोबाईल इंडस्ट्री, धातू, बँकिंग, ङ्गर्मास्युटिकल्स् आणि आय.टी. कंपन्यांमध्ये तेजी आहे आणि या कंपन्यांतच गुंतवणूक करण्यात गुंतवणूकदारांचे हित आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत ओव्हर प्राईस्ड् शेअर्स विकत घेऊ नयेत, असे इशारे काही गुंतवणूक विशेषज्ञांनी दिले आहेत.

शेअर बाजारात आलेली ही तेजी अमेरिकी सरकारच्या काही घोषणांचा परिणाम आहे. त्या सरकारने सरकारी रोख्यांच्या संबंधात काही सकारात्मक संकेत दिल्यामुळे बाजारातील तेजीची भावना वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी ङ्गार प्रभावित होऊ नये. कारण बाजारातली तेजीची भावना अटकळीवर आधारलेली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment