लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळला

रांची- चारा घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज रांची न्यायालयाने फेटाळून लावला आहे. लालू प्रसाद यादव यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना आगामी काळात तुरुंगात राहवे लागणार आहे.

१७ वर्षापूर्वी केलेल्या चारा घोटाळयाप्रकरणी रांचीच्या एका विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली असून सध्या ते तुरूंगात आहेत. याशिवया संसदेन त्यांची खासदारकी देखील रदद़ केली आहे. त्या‍मुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या लालू प्रसाद यादव यांनी रांची येथील कोर्टात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.

Leave a Comment